प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला ते मराठी पत्रकार, समाज सुधारक , वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते महात्मा फुले हे त्यांचे आदर्श होते शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे ते वडील होते आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आजोबा .
सामाजिक सुधारणा केल्याशिवाय समाजात इच्छित बदल होणार नाहीत .म्हणून सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी अविरत लढा दिला .त्यांच्या लढ्यापासून व तत्त्वापासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण ते कुठल्याही आमिषाला बळी पडले नाहीत अन्याय , रूढी ,जातीवाद आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व लेखन व प्रत्यक्ष कृती या त्रिसूत्रीचा त्यांनी वापर करून पुराण मतवाद्यांशी प्रखर लढा दिला ते एक कुशल संघटकही होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फार मोठे योगदान दिले त्यावेळी त्यांची वयही बरेच झाले होते अशा काळात त्यांनी चळवळीचे नेतृत्व केले कारावासही भोगला यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती व पक्षांना एकत्र जोडून ठेवले होते त्यांनी 'प्रबोधन ' हे साप्ताहिक सुरू केले ते नाटक कंपनीचे चालक होते ते एक छायाचित्रकार होते चित्रकार होते तसेच व्यंगचित्रेही उत्कृष्ट काढत असत ते प्रबोधनकार ठाकरे या नावानेच ओळखले जातात . त्यांचे २० नोव्हेंबर 1973 रोजी मुंबईत निधन झाले .
1 Comments
खूपच सुंदर सर👌👌👌🌹🌹
ReplyDelete