ए पी जे अब्दुल कलाम म्हणजेच (ए पी जे म्हणजे अब्दुल पाकीर जैनुलाद्दीन) कलाम हे भारत मातेचे एक महान सुपुत्र, एक महान भारतीय शास्त्रज्ञ भारताचे 11 वे राष्ट्रपती होते.
ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वर मधील धनुष्कोडी या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते ते रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करत होते. डॉ. कलाम यांचे शालेय शिक्षण रामनाथपूरला पूर्ण झाले .कलाम यांच्या वडिलांचे निधन कलाम लहान असताना झाले त्यामुळे वर्तमानपत्रे विकून तसेच छोटी-मोठी कामे करून ते पैसा गोळा करत व घरी मदत करीत.
क्षेपणास्त्र विकासातील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांना जगभर लौकिक मिळाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून सर्वत्र कौतुक झाले कलाम हे मनाने खूप संवेदनशील होते लहान मुलांशी गप्पा मारणे हे त्यांना आवडायचे त्यांच्या या महान कार्यामुळेच त्यांना 'पद्मभूषण' , 'पद्मविभूषण' आणि भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार "भारतरत" देऊन गौरवण्यात आले.
27 जुलै 2015 ला शिलॉंग येथे ह्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला. त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.
0 Comments