Subscribe Us

Header Ads

२ ऑक्टोबर गांधी जयंती




राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी .  त्यांचा जन्म गुजरात मध्ये पोरबंदर येथे २ऑक्टोबर १८६९मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते       
      त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला . त्यांनी असामान्य कृती आणि अहिंसक विचारांनी संपूर्ण जगाची विचारसरणी बदलून टाकली .स्वातंत्र्य आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांच्या  जीवनाचे एकमेव ध्येय होते 
     ते भारताच्या आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते . ते सत्याग्रहाच्या माध्यमातून ब्रिटिश जुलूनशाहीचा प्रतिकार करणारे अग्रणी नेते होते ते अहिंसेचे पुजारी होते त्यांना रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा ही पदवी दिली होती त्यांना बापू या नावानेही ओळखले जाते . 
    त्यांचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती आणि जगभरात अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो .


Post a Comment

0 Comments