कारंजा येथे २ ऑक्टोबर २०२३ ला जिल्हाध्यक्ष अजय मोटघरे यांच्या निवासस्थानी राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे अमरावती विभाग प्रमुख गजानन गायकवाड सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली
सर्वप्रथम संघटनेचे विभाग प्रमुख गजानन गायकवाड , उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झालेले संघटनेचे सल्लागार भारत लादे आणि सेवानिवृत्त झालेले मार्गदर्शक गोवर्धन मुंदडा सर यांचा सत्कार करण्यात आला .
१) सभेमध्ये २०१४ नंतर राज्य / राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना दोन ज्यादा वेतन वाढी
२) शासनाचे ओळखपत्र
३) जिल्हा परिषदेमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या धर्तीवर बोर्ड तयार करून लावणे
४) वाशिम जिल्ह्याची यशोगाथा संपादन प्रकाशित करणे
५) विद्यार्थी हिताचे कार्यक्रमाचे आयोजन करणे .
इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली तसेच ग्रुप मधील सर्व सभासदांना पावती देऊन सभासद करणे .
वेळोवेळी राज्य कार्यकारिणी जे निर्णय घेतले त्याला पाठिंबा देणे व अंमलबजावणी करणे .
इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली तसेच दर दोन महिन्याचे अंतराने मीटिंग चे आयोजन करणाचे ठरविण्यात आले
संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी केंद्रप्रमुख आनंद सुतार सर, कोषाध्यक्षपदी संभाजी साळसुंदर सर, जिल्हा उपाध्यक्षपदी , डॉ. मुरलीधर जाधव सर, मोहन शिरसाट सर, विलास गांजरे सर , पंढरीनाथ चोपडे सर, दीपक राऊत सर , संतोष पट्टेबहादूर सर, सहसचिव पदी प्रमोद जाधव सर, जिल्हा संघटक पदी डॉ. संतोष पेठे यांची एकमताने निवड करण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष अजय मोटघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव अर्जुन वरघट यांनी केले
मीटिंग चे यशस्वी आयोजन व नियोजन जिल्हाध्यक्ष अजय मोटघरे सर आणि विलास गांजरे सर यांनी केले .
0 Comments