Subscribe Us

Header Ads

३१ ऑक्टोबर इंदिरा गांधी स्मृती दिन / राष्ट्रीय संकल्प दिवस

 


इंदिरा गांधी ह्या महान देशभक्त होत्या त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 ला उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आताच्या प्रयागराज येथे झाला. त्यांना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला होता त्यांच्या आईचे नाव माता कमला तर वडीलाचे नाव जवाहरलाल नेहरू होते. आजोबा मोतीलाल नेहरू व वडील जवाहरलाल नेहरू यांचा समृद्ध राजकीय वारसा लाभल्यामुळे बालपणातच इंदिरा गांधींना देशभक्तीचे व राजकारणाचे बाळकडू बालपणीच मिळाले होते वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा विवाह फिरोज गांधीशी झाला ते 'नॅशनल हेरॉल्ड 'या वृत्तपत्रात काम करत होते. नंतर ते लोकसभेचे खासदार सुद्धा झाले नंतर इंदिराजींना संजय गांधी आणि राजीव गांधी ही दोन मुले झाली.

      पंतप्रधान नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिराजींनी काम केले आणि शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर भारताच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. इंदिरा गांधींनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात देशाची आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. देशातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी 'गरिबी हटाव' हा कार्यक्रम हाती घेतला पाकिस्तानच्या पूर्व बंगालमधील गांजलेल्या प्रजेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी पाकिस्तानचे बांगलादेश व पाकिस्तान असे दोन तुकडे केले इसवी सन 1971 मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

             त्यांचा शेवट अतिशय दुदैवी झाला 31 ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यातच त्यांचा अंत झाला. अशा ह्या महान प्रेरणादायी मातेचा मृत्यूदिन हा  'राष्ट्रीय संकल्प दिवस' म्हणून देशभर साजरा करण्यात येतो त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Post a Comment

0 Comments