लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये उत्तर प्रदेशातील मुघलसराई या गावी झाला . त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण त्याचे शास्त्री झाले . त्यांच्या जन्मानंतर लवकरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांचे बालपण त्यांच्या मामाच्या आधाराने व आश्रयात मामाच्या गावी झाले .
शास्त्रीजीवर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव होता शास्त्री जेवढे मृदू तेवढेच निश्चय होते त्यांचे राहणीमान साधे होते 1927 साली ललिता देवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला . आपले पती समाजसेवक , लोकसेवक असल्यामुळे पत्नीचे त्यांना सहकार्य लाभले . देशाची गरज व उणिवा काय आहेत ? कोणत्या देशाकडून कुठला आदर्श घ्यावा हे त्यांनी जाणले होते .
पंडित नेहरूंच्या निधनानंतर देशाची सूत्रे त्यांच्या हाती आली ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले 18 महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत त्यांनी आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे आपल्या कृतीतून सिद्ध केले .
शास्त्रीजींच्या संपूर्ण जीवनातून एक आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे ? राजकीय व्यक्तींनी आदर्श घ्यावा असेच आहे .अतिशय प्रामाणिक निष्कलंक चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी आणि कठीण प्रसंगात सुद्धा धैर्याने निर्णय घेणारे धैर्यवान सेनापती म्हणूनच त्यांची ख्याती आहे.
"मूर्ती लहान पण कीर्ती महान" अशी ओळख असणारे कुठल्याही अमिषाला बळी न पडणारे निडर व्यक्तिमत्व म्हणून जगात देशाची मान उंचावणारे थोर पुढारी म्हणजेच लाल बहादुर शास्त्री !.
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे ही जाणीव असणारे आणि देशाचे रक्षण संरक्षण करणारा सैनिकांचा स्वाभिमान जपणारे आणि त्यांच्यासाठी "जय जवान जय किसान " ही घोषणा देणारे भारत मातेचे सुपूत्र खरोखरच थोर आहेत .
0 Comments