राष्ट्रीय/राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य,जिल्हा शाखा अकोलाची जिल्हा कार्यकारिणी सभा संघटनेचे राजाध्यक्ष श्री.सुभाष जिरवणकर सर यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती विभागीय अध्यक्ष श्री.गजानन गायकवाड सर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य प्रतिनिधी श्री.अजय टाले सर यांच्या अकोला येथील निवासस्थानी दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी यशस्वीपणे पार पडली.
सभेत संघटनेचे मुख्य मार्गदर्शक श्री.साहेबराव पातोंड सर व श्री.शशिकांत ढोमणे सर,राज्य प्रतिनिधी श्री.अजय टाले सर,जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण डांबलकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.गोपाल मानकर सर,जिल्हा सरचिटणीस श्री.दत्तात्रय सोनोने सर,जिल्हा कोषाध्यक्ष तथा शिक्षण समिती सदस्य श्री.प्रमोद फाळके सर,जिल्हा प्रतिनिधी श्री.उमेश सराळे सर ,संघटनेचे सल्लागार श्री.गजानन डोईफोडे सर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेतील निर्णयांची माहिती उपस्थित सभासदांना देण्यात आली.पूर्वीप्रमाणे दोन वेतनवाढी लागू करण्याबाबत शासन निर्णय काढण्याबाबत राज्य संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ठरविण्यात आली.राष्ट्रीय/राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावाचा फलक जिल्हा परिषदेत लावण्याबाबत हिंगोली पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्याचे धोरण याप्रसंगी ठरविण्यात आले.
नुकताच राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल श्री.उमेश सराळे सर,सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्री.साहेबराव पातोंड सर ,श्री.शशिकांत ढोमणे सर व श्री.गजानन डोईफोडे सर यांचा याप्रसंगी संघटनेच्या सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.सुभाष जिरवणकर सर व विभागीय अध्यक्ष श्री.गजानन गायकवाड सर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण डांबलकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा सरचिटणीस श्री.दत्तात्रय सोनोने यांनी केले.
0 Comments