Subscribe Us

Header Ads

14 नोव्हेंबर बालदिन तथा पंडित नेहरू यांची जयंती!



       स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल तर आईचे नाव स्वरूपराणी होते .

     जवाहरलाल नेहरूंचे बालपण घरची गर्भजातश्रीमंती मुळे अतिशय लाडात व कौतुकात गेले त्यांचे शिक्षण घरच्या घरीच झाले उच्च शिक्षण लंडनमध्ये झाले ते इस .सन .1912 साली बॅरिस्टर होऊन भारतात आले सरकारी नोकरी न करता वडिलांचा वकिलीचा व्यवसाय पुढे चालवावा यासाठी त्यांनी वकिली सुरू केली पण वकिलीत मन रमत नव्हते नंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले 1916 साली कमलादेवी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला नंतर त्यांना प्रियदर्शिनी म्हणजेच इंदिरा गांधी हे कन्यारत्न प्राप्त झाले .नंतर ते गांधीजींच्या सहवासात आल्या ऐषो आरामीचा त्याग करून स्वराज्यासाठी होत असणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी तुरुंगवास भोगला ते १९२९ साली काँग्रेसचे अध्यक्ष झाले अहमदनगरच्या किल्ल्यात तुरुंगात असताना त्यांनी भारताचा शोध  Discovery of India हा ग्रंथ लिहिला.

       15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला भारत माता इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली तसेच आधुनिक भारताचा पाया रचला म्हणून त्यांना आधुनिक भारताची शिल्पकार म्हटले जाते . 1955 मध्ये त्यांना ' भारतरत्न  ' सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला.

        पंडित नेहरूंना लहान मुले आणि गुलाबाची फुले फार आवडत असत म्हणूनच ते नेहमी आपल्या कोटावर गुलाबाची फुलं लावत असत गुलाबा एवढेच मुलावर सुद्धा त्यांचे प्रेम होते मुल व फुल हा त्यांचा कौतुकाचा विषय होता. मुलं त्यांना  'चाचा' म्हणत 14 नोव्हेंबर च्या दिवशी ते मुलांच्या मेळाव्यात स्वतःला विसरून जात म्हणून त्यांचा जन्मदिन हा देशभर ' बालदिन ' म्हणून साजरा केला जातो.  दिल्ली येथे 27 मे 1964 ला मुलांचे लाडके चाचा नेहरू सर्वांना सोडून गेले .

Post a Comment

0 Comments