जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीजवळ उलिहातू येथे आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगाना व आईचे नाव करमी होते.
बिरसाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती त्यामुळे आई वडील शेतमजूर असल्यामुळे व गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्याला मामाच्या घरी शिक्षण घ्यावे लागले तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले . बिरसाला संगीत व नृत्यांमध्येही रस होता.
संपूर्ण देश हे इंग्रजाच्या गुलामीत होता इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपारिक अधिकार नाकारला त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजाविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला बिरसाने इंग्रजा विरुद्ध प्रचंड आंदोलन केले त्यामुळे इंग्रज सरकारने बिरसाला दोन वर्षाची शिक्षा ठोठावून हजारीबागच्या तुरुंगात डांबले तेव्हा बिरसाने इंग्रजांची सत्ता मुळापासून उपटून टाकण्याचा संकल्प केला.
बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी इंग्रजा विरुद्ध लढाई करून इंग्रजांना जेरीस आणले पण अत्याधुनिक शस्त्रा पुढे व मोठ्या सैन्य बळा पुढे आदिवासी क्रांतिकारक टिकाव धरू शकले नाहीत 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी शहीद झाले.
आदिवासी समाजाचे शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे बिरसाने ओळखले त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडाना अजरामर स्थान आहे सण १९०० मध्ये बिरसा मुंडा आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना इंग्रज सैन्याने अचानक हल्ला चढवला व बिरसा मुंडांना बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले ह्यातच 9 जून 1900 मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांना वीरगती प्राप्त झाली. या वीराने आदिवासींच्या न्याय व हक्कासाठी आपले बलिदान दिले त्यामुळे लोकांनी त्यांना 'जननायक' ही पदवी बहाल केली.
0 Comments