दिवाळी हा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण आहे दिवाळी हा दिव्यांचा सण आहे घरोघरी दिवे लावून घरात प्रकाश केल्या जातो आणि घरावर सुद्धा विविध प्रकारच्या रोशनाई केल्या जातात दिवाळी ह्या सणाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते लाडू चिवडा आणि विविध प्रकारची मिठाई हे या सणाचे खास वैशिष्ट्ये आहेच . पण हा खरा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे .
दिवाळीत फटाके सुद्धा मोठ्या प्रमाणात उडवून आतिषबाजी केली जाते ती आतिषबाजी फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे आणि ती एक फार मोठी समस्या निर्माण झाली आहे . फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होत आहे त्यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढून श्वसनासंबंधीच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत फटाक्यांच्या आवाजामुळे प्राणी पक्षी सुद्धा बाधित होत आहेत व मृत्युमुखी पडत आहेत तसेच अनेक व्यक्तींना सुद्धा कायमचे बहिरेपणा येत आहे . फटाक्यामुळे गंभीर इजा सुद्धा होऊ शकतात अनेक मुले आपले डोळे, हात व पायांना इजा करून घेतात किंवा आपला जीव सुद्धा गमाववतात .
त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्र . २ येथील पर्यावरण पूरक उपक्रम अंतर्गत शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड ) यांनी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले व तशी प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांना दिली तसेच फटाक्यांच्या पैशातून अभ्यास उपयोगी शालेय साहित्य खरेदी करून नवा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होणार नाही आणि पर्यावरण पूरक दिवाळी व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केल्याचा आनंद सुद्धा होईल .
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिवाळी चे शुभेच्छा कार्ड तयार केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेच्या वतीने जि प शाळा काटा क्र. २ ,उर्दू शाळा काटा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूरलाडू चिवडा व चकलीचे वाटप करण्यात आले .
0 Comments