संत जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्रतील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी तेली समाजात झाला . त्यांच्या वडीलाचे नाव विठोबा व आईचे नाव मथाबाई होते हे कुटुंब विठ्ठल भक्त कुटुंब होते त्यामुळे संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते . त्यांना बालपणापासूनच किर्तन व भजनाची आवड लागली होती . संत तुकोबाराय यांनी नियुक्त केलेल्या 14 टाळकऱ्यांपैकी संत जगनाडे महाराज एक होते त्यांनी स्वतःचे अभंग लिहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे संत तुकोबारायांची गाथा लिहिण्याचे भाग्य ही त्यांना लाभले .त्यांचा जन्म तेली समाजात झाल्यामुळे हिशोब करता येणे गरजेचे होते संताजी अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे असल्यामुळे त्यांना लिहिता वाचता येणे आणि हिशोब करता येणे एवढे शिक्षण त्यांनी घेतले परंतु त्यांची निरीक्षण शक्ती सूक्ष्म होते . संताजी महाराजांच्या बालपणीची एक घटना सांगितली जाते ते रोज आपल्या आईसोबत गावातल्या चक्रेश्वर मंदिरात जात असत या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य द्यायची . मंदिरात अनेक जण आश्रयाला राहत असत एके दिवशी एक भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य त्यांना दिसला संताजींनी नैवेद्याचे ताट त्या भुकेल्या माणसाला दिली तो जेवून तृप्त झाला परंतु नैवेद्यासाठी आणलेत ताट संताजींनी कुणालातरी दिले त्यामुळे आई रागावली त्यावर संताजी म्हणाले की ज्याला अन्नाची जास्त गरज होती त्याला दिले पाहिजे ! म्हणजे भुकेल्यातही त्यांना पांडुरंग दिसला . आणि लहानपणीच माणसात ईश्वर पाहण्याची दृष्टीचे मानवतावादी संत म्हणजे संत जगनाडे महारज .
बालवयातच त्यांचा विवाह वयाच्या १२ वर्षी यमुनाबाईची झाला . व त्यांती आपला पारंपारीक तेल घाण्याचा व्यवसाय सुरु केला . लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते त्याकाळी संत तुकाराम महाराजांची किर्ती सगळीकडे पसरली होती असेच एकदा तुकाराम महाराज संताजीच्या गावी कीर्तनासाठी आले होते त्यांचे कीर्तन ऐकून संताजी वर तुकोबारायांचा मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुकोबारायांनी संताजींना समजावून सांगितले की 'संसार करून सुद्धा परमार्थ करता येतो ' तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज संत तुकारामाच्या टाळकऱ्यामध्ये सामील झाले व शेवटपर्यंत सामाजिक कार्यात त्यांनी वाहून घेतले त्यांचे विचार आणि साहित्य सर्व समाजाला प्रेरणादायी आहे .संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्यापर्यंत पोहोचला . इंद्रायणीच्या डोहात बुडवलेल्या गाथा जनसागरातून बाहेर काढून पुन्हा लिहिण्याची किमया जगनाडे महाराजांनी केली . हे अभंग त्यांनी पुन्हा लिहून काढल्यामुळेच आपल्याला ते आज आचरणात आणायला व वाचायला व जगायला शिकवतात .त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 9 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावर एक पोस्टाचे तिकीट निघाले अशा महान संताचा मृत्यू 1688 मध्ये झाला . परंतु परंतु त्यांचे कार्य आजही सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे !
1 Comments
Beautiful Art and Artical 👌👌👌
ReplyDelete