संपर्क फाउंडेशन तर्फे शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सात विद्यार्थी स्पर्धेत विजयी झाले त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा काटा क्र . २ येथील कृतिका प्रदीप कांबळे व अक्षरा विशाल ताजणे वर्ग तिसरा या विद्यार्थिनींनी बाजी मारली त्याबद्दल त्यांना संपर्क फाउंडेशन तर्फे ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड वर्गशिक्षिका चंदा खंदारे ( गायकवाड ) तसेच संपर्क फाऊंडेशन चे वाशिम जिल्ह्याचे जिल्हा संयोजक महेश होले यांची उपस्थिती होती .संपर्क फाउंडेशन ही संस्था जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयाचे आनंददायी व कृतीयुक्त व परिणामकारक शिक्षण देण्यासाठी साधनांची निर्मिती करून शिक्षक व विद्यार्थ्यांना मदत करत असून त्यांचे उल्लेखनिय कार्य महाराष्ट्रासह आठ राज्यात सुरू आहे.
जिल्हा परिषद शाळा काटा क्र २ येथील विद्यार्थ्यांना संपर्क फाउंडेशनने सन्मानित केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड व शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड) यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड) यांनी केले.
0 Comments