Subscribe Us

Header Ads

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन

 





        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी तत्वज्ञ तथा समाज सुधारक होते त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर (सपकाळ) होते. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मधे मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव होते. सुरुवातीचे शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले नंतर साताऱ्याच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला भीमराव ६ वर्षाचे असतानाच त्यांची आई भीमाबाई वारली त्यामुळे त्यांचे पालन पोषण त्यांचे वडील रामजी व आत्या मीराबाई यांनी केले.

         बालपणापासूनच भीमरावांना अस्पृश्यतेचे चटके बसू लागले अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्म झाल्यामुळे घडोघडी त्यांचा अपमान होऊ लागला पण त्यांना त्याही काळात अनेकांचे सहकार्य मिळाले केळुस्कर गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे भीमराव उत्तम गुणांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाला पदवीपर्यंत शिक्षणानंतर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने  परदेशात शिक्षणासाठी गेले तेव्हा त्यांची पत्नी रमाबाई यांनी आपले पती शिक्षणासाठी परदेशात गेल्यामुळे अतोनात हाल व कष्ट सहन केले व आपल्या पतीला सहकार्य केले.

         परदेशातून एम ए . व पी . एच .डी च्या पदव्या प्राप्त करून भारतात आल्यानंतर कराराप्रमाणे बडोद्याच्या सरकारने त्यांना नोकरी दिली पण तिथेही जातीयवस्था आड आली शिपाई टेबलवर फाईल दुरुनच फेकायचा तथा त्यांना पाणी सुद्धा प्यायला द्यायचा नाही. तिथे सुद्धा त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले जाऊ लागल्याने व अपमानित होऊ लागल्याने नोकरी सोडून द्यायची वेळ आली व नंतर मुंबईत सिडनहॅम कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली आपल्याला जसे अस्पृश्यतेचे चटके बसले तसे आपल्या बांधवांना बसू नये त्यांना त्या त्रासातून मुक्त करावे व त्यांना जागृत करण्यासाठी आयुष्यभर बाबासाहेबांनी प्रचंड काम केले ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक व निष्णात वकील होते त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारांमध्ये व चर्चा मध्ये सामील झाले त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे काढली दलितांसाठी राजकीय हक्क सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले स्त्रियांच्या हक्कासाठी लढा व कार्य केले हिंदू कोड बिलासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

        बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती म्हणून त्यांनी पुस्तकासाठी घर तयार केले मुंबईतील त्यांच राजगृह म्हणजे विविध ग्रंथांचा प्रचंड खजिना होता त्यांनी विआर्थ्यांना शिका ! संघटित व्हा ! व संघर्ष करा ! हा मंत्र दिला स्वातंत्र्य समता बंधुता व मानवतेसाठी अनेक ग्रंथाचे लेखन केले . शाळा महाविद्यालयाची स्थापना केली 14 ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला . धर्मांतरानंतरच काही महिन्यात म्हणजे 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला अशा ह्या ज्ञानाच्या अथांग सागरास महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन !

Post a Comment

0 Comments