Subscribe Us

Header Ads

23 जानेवारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती

 



नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ओरिसा राज्यातील कटक येथे झाला . त्यांच्या वडिलांना रायबहादूर ही पदवी दिली होती . आणि ते कटक मधील प्रसिद्ध वकील होते .सुभाष चंद्र बोस यांनी कटक येथे प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले .वयाच्या सोळाव्या वर्षी स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांचे साहित्य वाचल्यानंतर त्यांच्या शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला . त्यानंतर भारतीय नागरी सेवा (आय .सी .एस . )ची तयारी करण्यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले 1920 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा पास केली पण सरकारी नोकरी करावी लागणार त्यामुळे ते सनद न घेताच भारतात परत आले .
     भारतात आल्यानंतर सुभाष बाबू राष्ट्रीय चळवळीत सामील झाले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले पण महात्मा गांधींची तात्विक मतभेद झाल्याने त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली त्यांना 1941 मध्ये इंग्रज सरकारने घरीच नजर कैदेत टाकले पण ते वेश परिधान करून भारतातून निसटले ते थेट जर्मनीत हिटलर यांना जाऊन भेटले पण त्यांच्याकडून हवे तसे  सहकार्य मिळाले नाही . परत जपान ला गेले .
   सुभाष चंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून विकसित करण्यासाठी 1943 मध्ये सिंगापूरला आले सुमारे 45 000 सैनिकांची आझाद हिंद फौज बनवली ज्यात भारतीय युद्ध कैदी आणि दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांचा समावेश होता .
   आझाद हिंद फौजेमध्ये देशाच्या आत आणि बाहेरील भारतीयांना प्रेरणा मिळाली जी त्यांच्या "दिल्ली चलो " घोषणेसाठी आणि अभिवादनासाठी प्रसिद्ध होती भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी आग्नेय आशियातील सर्व प्रदेश व संप्रदायातील भारतीयासह सैन्यात सामील झाले .भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या आजाद हिंद फौजेचे महिला युनिटचे नाव "राणी झाशी "होते त्यांचे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले . आझाद हिंद फौज भारतीयांमध्ये एकता आणि शौर्याचे प्रतिनिधित्व करणारी शक्तिशाली संघटना होती जपानच्या आत्मसमर्पणाच्या काही दिवसानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील सर्वात प्रभावशाली नेतृत्वाचा विमान अपघातात मृत्यू झाला ."तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा " हे त्यांचे ब्रिद होते .

Post a Comment

0 Comments