Subscribe Us

Header Ads

3 जानेवारी 'ज्ञानज्योती' सावित्रीबाई फुले यांची जयंती!

 



भारतीय शिक्षणाचे आराध्य स्थान माता , " ज्ञानमाता" सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडीलाचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वडील गावचे पाटील होते त्यामुळे त्यांना गावात मानाचे स्थान होते गावात त्यांचा आदर होत होता त्याचा अनुभव सवित्रीबाईंना नेहमी येत होता .
      स्त्रियांना अतिशय गौण स्थान असणाऱ्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला वडील गावचे पाटील असल्यामुळे सावित्रीबाईंचे बालपण अतिशय लाडात व आनंदात गेले सर्वजण त्यांना लाडाने साऊ म्हणत असत
      सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्षे वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला . ज्योतिबांना लहानपणापासून जातीयतेचे चटके बसले होते अमानुष रूढी - परंपरा कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठत असे ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना साक्षरतेचे धडे देऊन निरक्षर असलेल्या साऊला साक्षरच नव्हे तर प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका करून शिक्षण क्षेत्रात क्रांती केली पुण्यात बुधवार पेठेत मुलींची शाळा काढली  शाळेत शिकवायला शिक्षक मिळेनात तेव्हा हे काम सावित्रीबाईंनी धाडसाने केले रस्त्याने जाताना सावित्रीबाईंना दगड धोंडे व शेण अंगावर घ्यावे लागले . त्याकाळी मुलींचे शिक्षण म्हणजे धर्मद्रोही काम होते त्यामुळे त्यांना महार मांगाच्या पोरांना शिकवण्याचे खूळ डोक्यातून काढा अथवा घर सोडा असे ज्योतिबांचे वडील गोविंदराव फुले यांनी कर्मठ लोकांच्या वबावामुळे बजावले तेव्हा महात्मा फुले व सावित्रीबाईंनी घर सोडले पण शिक्षणाचे पवित्र कार्य सोडले नाही  . महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे साथ सावित्रीबाईंनी दिली त्यांनी अनेक ठिकाणी शाळा काढून क्रांतीची ज्योत पेटवली . 1887 मध्ये ज्योतिरावांना पक्षघात झाला व 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्या आजारात त्यांचे निधन झाले त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पण .त्या डगमगल्या नाहीत सावित्रीबाईंनी अधिक  नेटाने समाजसेवेचे व्रत पुढे चालू ठेवले .
    दत्तकपुत्र यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी देत नव्हते तेव्हा एक सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांनी त्यांची राधा नावाची मुलगी त्यांना देऊन 4 फेब्रुवारी 1889 रोजी त्यांचा विवाह करून दिला महाराष्ट्रातील हा पहिला अंतर जाती विवाह म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली .
     पुण्यात जेव्हा 1897 मध्ये प्लेग ची साथ आली हा जीवघेणा आजार अनेकांना मृत्यूच्या दाढेत लोटत होता तेव्हा यशवंतर ला माळराणावर दवाखाना सुरू करायला लावले . व प्लेग पिडीतांची सेवा आई सावित्रीमाता व यशवंताने सुरू केली अशातच एक प्लेग झालेला मुलगा खांद्यावर दवाखान्यात नेताना माता सावित्रीबाईंना संसर्ग झाला यातच त्यांची 10 मार्च 1897 रोजी प्राणज्योत मालवली .
       सावित्रीबाईंच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा  केला जातो . त्या ज्ञानभाता , ज्ञानज्योती , क्रांतीज्योती म्हणूनही ओळखल्या जातात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी त्यांच्या नावाने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या नावाने राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते त्यांचे कार्य त्यांचे समर्पण त्यांचा त्याग  संपूर्ण देशवासीयांना सदैव प्रेरणात राहील असाच आहे .

Post a Comment

0 Comments