मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्रमांक २ येथील शिक्षक गजानन गायकवाड यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले त्याचबरोबर उपक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी रंगीत खडूने फलक लेखन केले . या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला त्यांनी तसे पत्र सर्व विद्यार्थ्यांना दिले
"नव्या दिशेचे नव्या उषेचे गीत सूर हे गाती,
या मंगल देशाचे आहे भविष्य आपल्या हाती '
त्यांनी पत्रात म्हटले आहे की आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे शेतकऱ्यांनी , कष्टकऱ्यांनी ,बुद्धिवंतांनी , विचारवंतांनी आपला देश घडवला आहे .जनसामान्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे .भारत देशाचे , आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमान काळातच म्हणजे आत्ताच करावी लागणार आहे शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा आहे त्यासाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला असून यात प्रामुख्याने "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे .
या अभियानांतर्गत चाकोरी बाहेरील विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना मिळेल विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यायोगे साहित्याप्रती त्यांच्या अभिरुची निर्माण व्हावी सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी महावाचन महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी माझी शाळा माझी परसबाग हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे जात आहे सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा २ हे अभियान राबविण्यात आले आहे . व येत आहे या सर्व उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री महोदयांनी केले आहे .
0 Comments