Subscribe Us

Header Ads

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्रमांक २ येथे माता पालक मेळावा संपन्न !

 


दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ला आयोजित माता पालक मेळाव्या चे उद्घाटन काटा ग्रामपंचायत च्या सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांनी केले त्यांनी आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले असून आपल्याला जिल्हा परिषद शाळेचा अभिमान आहे माझ्या सरपंच पदाच्या काळामध्ये मला प्रशासकीय कामाचा अनुभव आला आणि आईची किती महत्त्वाची भूमिका बालकाच्या जडणघडणीमध्ये असते याची जाणीव झाली मी माझ्या व्यस्त कामातून दररोज दोन तास मुलांचा अभ्यास घेते शाळेत कोणता अभ्यास दिला तो पूर्ण करून घेते . या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिका अतिशय तळमळीने शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांचे योगदान शाळेसाठी देतात पण आपण सुद्धा त्यांना वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे त्यांनी बोलावलेली मिटींग आपल्याच मुलांच्या हितासाठी असते जाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले व मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेला दोन पंखे देण्याचे कबूल केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड व शिक्षिका खंदारे (गायकवाड )  यांचे खूप खूप कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड होते त्यांनी मातांची भूमिका आपल्या पाल्याच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगून वेळेवर होणाऱ्या मिटींगला गट लीडर आणि त्या गटातील सर्व माता यांनी आपापल्या मुलांचा अभ्यास घ्यावा वेळोवेळी पाठवलेले व्हिडिओ व त्यांच्या ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घ्याव्यात अशी विनंती सर्व मातांना केली .

यशस्वी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे गायकवाड यांनी केले त्यांनी सर्व मातांना एकत्र आणून सर्व गट लीडर माता सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या यांचे गुच्छ देऊन स्वागत केले .
मुलांच्या शिक्षणात आपली भूमिका सगळ्यात महत्त्वाची असून आपण कुठेही काटकसर करू नका असे सांगीतले . याप्रसंगी पुष्पाताई प्रदीप कांबळे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला वॉश बेसिन देण्याचे कबूल केले त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन केले .शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या पुष्पाताई प्रदीप कांबळे अनिता सुनील डाखोरे पूजा अनिल कांबळे ज्योती गजानन राठोड तसेच सर्व गट लीडर माता साधना सुनील कांबळे  ,पूजा अनिल कांबळे  ,रेश्मा बाळू कांबळे  ,अकिलाबी शेख सादिक  ,लक्ष्मी बारकू कांबळे साधना सुनील कांबळे दीक्षा विजय कांबळे  ,शारदा विशाल ताजणे  ,प्राजक्ता रमेश भोंगळ वैशाली दिलीप कांबळे शकुंतला विश्वनाथ कांबळे , प्रयागबाई दिलीप बांगर  ,माधुरी राजू बांगर चंद्रभागा अशोक बांगर ,मंगला बालू लगड , यांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments