Subscribe Us

Header Ads

जि प प्राथ शाळा काटा २ येथे लहान मुलांचे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर आरोग्य अधिकारी डॉ. गोपाल गायकवाड यांचे मार्गदर्शन!

 


    जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्र . २  येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत " लहान मुलांचे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय  ," या विषयावर प्राथामिक आरोग्य केंद्र काटा चे आरोग्य अधिकारी डॉ . गोपाल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना संभावित विविध आजार का होतात ? त्यांची माहिती देऊन त्यापासून संरक्षण कसे करायचे ? तसेच आजार होऊ नाही म्हणून कोणती काळजी घ्यावी ? याचे सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थांनी पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेच त्यामुळे त्यातून व्हिटॅमिन व मिनरल्स शरीरात जातात व शरीराचे पोषण होते परंतु लहान मुलांना खिचडीतील  किंवा पोषण आहारातील टमाटर बटाटे काढून टाकण्याची सवय असते मुले ती आवडीने खात नाहीत त्यामुळे त्यांचे शारीरिक नुकसान होते ते टाळण्यासाठी सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजेत असे सांगीतले .

    याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्र २ चे मुख्याध्यापक गजानन गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड त्यांनी केले याप्रसंगी आरोग्य सेवक सुनिल टोलमारे यांनी मुलांना हात धुण्याची पद्धत समजावून सांगितली व विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी, शौचाहून आल्यानंतर हात धुणे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थीनी कु वैष्णवी सुनिल डाखोरे हीने केले .

Post a Comment

0 Comments