जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्रमांक २ येथे बाल वयापासून बचतीचे महत्त्व या विषयावर काटा पोस्टमास्टर खुशबू महेक शेख अकरम यांनी "विद्यार्थ्यांना बालवयापासून बचतीचे महत्त्व " आणि मुलींसाठी व मुलांसाठी असणाऱ्या बचतीच्या पोस्टाच्या योजना यांची सखोल माहिती दिली.
याप्रसंगी त्यांनी सांगितले की सुकन्या योजना ही मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे वय वर्ष 10 पर्यंत असलेल्या सर्व मुलींना 15 वर्षासाठी दर महिना हजार रुपये भरावे लागतील व 21 व्या वर्षी त्यांना 5 लाख 50 हजार रुपये परत मिळतील तसेच शिक्षणासाठी अठराव्या वर्षी 50 टक्के रक्कम काढण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे या योजनेचा सर्व पालकांनी आपल्या मुलींसाठी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले तसेच पोस्टात बचत खाते काढून बालवयापासूनच बचत केल्यास बचतीचे फायदे भविष्यात मिळतात शिक्षणासाठी गरज पडेल तेव्हा पैसे मिळतील व आपले पैसे आपल्या खात्यातून केव्हाही काढता येतील तसेच आरडीची योजना सुद्धा सर्वांसाठी फायद्याची असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व काटकसर करून पैसे बचत करावे व आपल्या मुला मुलींचे भविष्य घडवावे शिक्षणासाठी व लग्नासाठी लागणारा पैसा पुष्कळ लागणार आहे तेव्हा आतापासून बचत करून भविष्याची चिंता दूर करा त्यासाठी पोस्टाची वेळ सकाळी ८ ते १२ असून सोमवार ते शनिवार या वेळात पोस्ट ऑफिसला भेट द्या व सर्वांनी आपले बचतीचे खाते आर डी चे खाते व सुकन्या योजनेचे खाते पोस्टात काढा असे आवाहन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड होते त्याचबरोबर माजी पोस्टमन भुजबळ काका तसेच पोस्टमन वैशाली लोखंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड) यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी वैष्णवी सुनील डाखोरे हिने केले.
0 Comments