जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्रमांक दोन येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी शेख हुसेन शेख सादिक याने त्याच्या वाढदिवसानिमित्त आज ५ मार्च २०२४ ला शाळेला पाण्याची टाकी भेट दिली आणि ही सरप्राईज गिफ्ट शाळेला आज दिली त्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गजानन गायकवाड तसेच शाळेच्या शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड) यांनी त्याचे खूप खूप अभिनंदन केले व त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्याचे वडील शेख सादिक शेख साबू तसेच त्याची आई अकीलाबी यांचे आभार मानले शेख हुसेन हा शाळेतील आदर्श विद्यार्थी असून अभ्यासात सुद्धा खूप हुशार आहे तसेच इतरांना मदत करणे हा त्याचा स्वभाव आहे अतिशय प्रेमळ आणि शाळेबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा असणारा विद्यार्थी त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त कुणालाही न सांगता शाळेत कशाची गरज आहे ती वस्तू ओळखून आज शाळेला पाण्याची टाकी आणून दिली यासाठी त्याने त्याच्या आईकडे आणि बाबाकडे हट्ट धरला आणि आज प्रत्यक्ष वाढदिवसाचा खर्च ड्रेसचा व केकचा खर्च वाचवून शाळेसाठी टाकी आणली हे त्याचे कार्य खूप खूप कौतुकास्पद आहे त्याला वाढदिवसानिमित्त शाळेकडून खूप खूप शुभेच्छा !🌹🌹🌹
0 Comments