Subscribe Us

Header Ads

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्र २ येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

 



        सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल भाऊ ताजणे यांनी ध्वज पूजन केले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर सामुहिक राष्ट्रगीत व राज्यगित झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल भाऊ ताजणे उपाध्यक्ष अमोल जोंधळे माजी अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे बारकू कांबळे संतोष बांगर पुष्पा प्रदीप कांबळे पूजा अनिल कांबळे व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .
      याप्रसंगी शाळेला पाच हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षिका रेखाताई बहादरे मॅडम यांचा सत्कार शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड ) यांनी केला तसेच मागील दोन वर्ष शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच पाच हजाराचे शैक्षणिक साहित्य देणारे तसेच यावर्षी शाळेला पाच हजाराची देणगी देणारे वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ तथा समाजसेवी डॉ . दीपक ढोके यांचा शाल बुके देऊन शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशालभाऊ ताजणे यांनी सत्कार केला .
गाव टीबीमुक्त  झाल्याबद्दल सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांचा तसेच मेडिकल ऑफिसर डॉ कोमल टारपे ( फुपाटे ) मॅडम यांचा सत्कार चंदा खंदारे (गायकवाड ) यांनी केला तसेच ग्रामसेवक दशरथ राठोड साहेब यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांनी केला  .
        माता पालक गटातील गट लिटर मातांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला . तसेच त्यांना निपुण प्रतिज्ञा देण्यात आली त्याच बरोबर सर्वांनी घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेतली .
       याप्रसंगी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात केंद्र शाळा काटा, जि प शाळा काटा क्र . २ तसेच उर्दू शाळा काटा च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली देशभक्तीपर गीत तसेच नृत्य करून सर्वांची मने जिंकली  त्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच जयाताई रामकिसन मोरे उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य रामकिसन मोरे ग्रामविकास अधिकारी दशरथ राठोड संजय रणखांब यांनी मुलांचे कौतुक केले . गाव पातळीवर गाव टिबी मुक्त करण्यासाठी  योगदान देणाऱ्या आशाताईंचा ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांनी सत्कार केला याप्रसंगी बहुसंख्य गावकऱ्यांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments