घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल ताजणे यांनी ध्वजपूजन केले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले .
जेसीआय वाशिम सिटी चे अध्यक्ष डॉ . रोशन व्यास सरपंच सौ. जयाताई रामकिसन मोरे मुख्याध्यापक गजानन गायकवाड शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड )तसेच जेसीआयचे सचिव मयूर चुंबळकर प्रा पंकज कुमार बांडे, संदीप बाहेती सागर दायमा राजेश कासट इंजि जितेंद्र बोडस रवी बुंधे आनंद डोडिया जेसीआरटी अध्यक्ष प्राजक्ता दायमा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग लेटर बुक पेन्सिल इरेझर क्रेऑन्स ड्रॉईंग बुक व वॉटर बॉटल आणि चॉकलेट चे वाटप करण्यात आले
डॉ .रोशन व्यास यांनी प्रास्ताविकतून जेसीआय वाशिम सिटीच्या कार्याची माहिती सांगून गरजवंतांना , विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून हे कार्य आणि अविरत सुरूच ठेवणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला ही खूप आनंद होत असल्याचे सांगितले त्यानंतर प्रा . पंकज कुमार बांडे यांनी जे सी आय ची प्रतिज्ञा घेतली त्यानंतर सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांनी जेसीआय वाशिम च्या वतीने देण्यात येणारी शैक्षणिक मदत खरोखर गोरगरीब झोपडपट्टीतील गरजवंत विद्यार्थ्यांना होत असून सरपंच तसेच एक आई म्हणून समजू शकते कारण येथील 90% समाज गोरगरीब रोज मजुरी करणारा आहे त्याचबरोबर या शाळेला लाभलेले सर आणि मॅडम खरंच कौतुकास्पद काम करत असून त्यांनी येथे आल्यानंतर शाळेचा चेहरा मोहरा बदलून आदर्श शाळा तयार करून आदर्श विद्यार्थी घडवत असून हे विद्यार्थी भविष्यात खूप पुढे जातील अशी खात्री आहे .
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांनी जेसीआय ही देशाभिमान जागृत ठेवून राष्ट्राला बळकट करण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्य तसेच निवारा या प्राथमिक गरजा ध्यानात ठेवून शैक्षणिक मदत तर करतेच पण त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींची सामाजिक जाण आणि कर्तव्याचे भान ठेवून अनेक उल्लेखनीय काम करते त्याबद्दलच - जेसीआय वाशिमचे अभिनंदन करून जेसीआय वाशिमचे अध्यक्ष डॉ .रोशन व्यास सचिव मयूर चुंबळकर त्याचबरोबर सुनीलभाऊ चांडक जितेंद्र बोडस पंकज बाजड रवी बुंधे आणि प्रा . पंकज बांडे यांचे विशेष आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड )यांनी केले .
0 Comments