संपूर्ण मानव जातीचे कल्याण साधणारे श्रेष्ठ भारतीय संविधान आहे !
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी भारतीय संविधान हे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता या मुल्यांबरोबरच संपूर्ण मानव जातीचे कल्याण साधणारे सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानानुसार देशाचा कारभार केल्यास आपला देश सर्वांगीण विकास साधेल !आज संपूर्ण देशभर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगिकृत करून स्वतः प्रत अर्पण केले आहे . हे संविधान निर्माण करण्यासाठी संविधान कार्याला दोन वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अपार परिश्रमाने या संविधानाची निर्मिती झाली म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते . याप्रसंगी शाळेत परिपाठात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले संविधान गीतावर कु . कृतिका प्रदीप कांबळे व प्रज्ञा विजय कांबळे यांनी नृत्य सादर केले याप्रसंगी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अमर विशाल ताजणे यांनी केली त्यानंतर संविधान नाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपती डॉ .राजेंद्र प्रसाद यांना संविधानाची प्रत देतानाचा प्रसंग साधण्यात आला त्यामध्ये संघर्ष दत्ता कांबळे, ऋत्विक संतोष लगड शेख हुसेन शेख सादिक अमर विशाल ताजणे प्रतीक बाळू कांबळे यांचा सहभाग होता त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून सुंदर हस्ताक्षरात संविधानाच्या प्रस्ताविकीचे लेखन करण्यात आले याप्रसंगी पुष्पा प्रदीप कांबळे लक्ष्मी बारकू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड )यांनी केले तर आभार प्रदर्शन शिकाऊ प्रशिक्षणार्थी पुनम गावंडे यांनी केले .
0 Comments