Subscribe Us

Header Ads

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्र २ येथे माता पालक मेळावा उत्साहात संपन्न!

जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षी माता पालक मेळाव्याचे आयोजन केल्या जाते .त्यामध्ये माता पालक संघ गट लिडर माता व सर्व विद्यार्थ्यांच्या मातांचा सहभाग असतो .

सर्वप्रथम सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांनी माता पालक मेळाव्याचे फीत कापून उद्घाटन केले .प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ .कोमल तारफे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र काटा यांची उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड सर यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले त्यानंतर शिकाऊ प्रशिक्षणार्थी पुनम गावंडे यांनी स्वागत गीत गायन केले त्यानंतर

  प्रास्ताविकातून शाळेतील शिक्षिका चंदा खंदारे (गायकवाड )यांनी विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक व बौद्धिक विकासासाठी  मातांची महत्त्वपूर्ण भूमिका असते त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले होमवर्क माता  घरी  मुलांकडून चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतात

त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक कार्यासाठी करून आपल्या मुलांचा अभ्यास घेण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलण्याचे आवाहन केले .

     यानंतर काटा ग्रामपंचायतच च्या सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांनी 

 " जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ! 

असं सांगून सर्व मातांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे व नियमित शाळेत आले पाहिजे व शिक्षकांशी त्यांच्या अभ्यासाविषयी चर्चा केली पाहिजे मी इतक्या व्यस्त कामातून माझ्या मुलांच्या अभ्यासासाठी दररोज वेळ काढते तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे !

   आपल्या गावाचे भाग्य आहे .की आपल्याला  अतिशय आदर्श शिक्षक जोडपे मिळाले असून हे दोघेही अतिशय प्रामाणिकपणे आपली सेवा येथे देत आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यांनी केलेलं कार्य खरच कौतुकास्पद आहे .मी ग्रामपंचायत च्या वतीने व माझ्या वतीने सर्वतोपरी या शाळेला मदत करणार असल्याचे सांगितले .

यानंतर प्रमुख मार्गदर्शक डॉ .कोमल टारफे यांनी आपण सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून MBBS झाली असल्याचे सांगून जिल्हा परिषद शाळेतील प्रगती पाहून समाधान व्यक्त केले तसेच सर्व मातांनी आपल्या मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन करून त्यामुळेच मुलांचा शैक्षणिक विकास होणार असल्याचे सांगितले कारण sound mind in sound body !

मुलांचे आरोग्य चांगले असले तरच त्यांची शाळेतील मनस्थिती चांगली राहील त्यामुळे त्यांची वैयक्तिक स्वच्छता त्यांचा आहार आरोग्य व गुणवत्ता  याचा परस्पर संबंध असल्याचे सांगितले तसेच कुठलीही वैद्यकीय अडचण भासल्यास मी तुमच्या सदैव सोबत आहे असे सांगून सर्व मातांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले .

    याप्रसंगी शाळेला या शैक्षणिक सत्रात शिक्षण सप्ताहामध्ये तिथी भोज देणाऱ्या रंजनाताई भगत यांचा शाळेच्या वतीने सरपंच जयाताई रामकिसन मोरे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला !

  याप्रसंगी माता पालक यांनी  गीत गायन संगीत खुर्ची नृत्य  हळदी कुंकू उखाणे इत्यादी उत्साहपूर्ण कार्यक्रमात भाग घेतला ! 

    याप्रसंगी पुष्पा प्रदीप कांबळे अकीलाबी शेख सादिक लक्ष्मी बारकू कांबळे पूजा अनिल कांबळे दीक्षा विजय कांबळे  माधुरी राजू बांगर चंद्रभागा अशोक बांगर पूजा अमोल जोंधळे यांच्यासह माता पालक संघाच्या सर्व सदस्य सर्व गट लीडर माता तसेच बहुसंख्य मातांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments